Web Analytics Made Easy - Statcounter

Shri Hanuman Chalisa PDF in Marathi

Shri Hanuman Chalisa PDF in Marathi

महान हनुमान चालिसाचा अर्थ – फ़ायदे आणि महत्व
हनुमान चालिसा ची रचना
“चालिसा” हा शब्द “ चालिस” या शब्दापासून घेतला गेला असून त्याचा अर्थ चाळीस असा होतो. चालिसा म्हणजे 40 ओळींमध्ये देवाची केलेली भक्ती आणि स्तुती, ती देवता इतकी महान का आहे किंवा त्याच्या अद्भुत शक्तीची माहिती याच्या माध्यमातून सांगितली जाते.

हनुमान चालिसा तुलसीदासांनी रचलेले काव्य आहे.

हनुमान चालिसा आरती
हनुमान किंवा मारूती शक्तीचे प्रतिक असून, श्रद्धा आणि जतन करण्याचा भाव त्याच्याकडून शिकता येतो. हनुमानाला विशेषत: मंगळवार आणि शनीवारी पुजले जाते आणि दुष्ट शक्तींपासून तो आपले रक्षण करील असे मानले जाते. हनुमान चालिसा मारुती रायाच्या स्तुतीपर आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास कसा दाखवावा हे त्यातून सांगितले जाते.इतरांकरता जगून, या भूतलाच्या संरक्षणाकरिता कार्य कसे करावे हेच तो आपल्याला सतत सांगत असतो.

रामायणातील हनुमान
रामायणातील सगळ्यात नम्र आणि शक्तीशाली पात्र, कधी कधी त्याच्यात असलेल्या अचाट शक्तीचा त्याला विसर देखील पडतो. हिंदु पौराणिक कथांमध्ये अशा पात्रांमधून बऱ्याचदा असे दर्शवून दिले आहे की माणूस म्हणून आपल्याला आपल्या क्षमता माहिती नसतात. आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण आपल्या अंतरंगात डोकावून अशा ताकदीचा शोध लावायचा असतो.

हनुमान चालिसाची रचना
हनुमान चालिसाची रचना ही इंटरनेटवरती तसेच विविध आध्यात्मिक पुस्तकांमधून उपलब्ध आहे. हनुमान चालिसा हे श्रद्धेने, प्रेमाने आणि मनात आध्यात्मिक भाव आणून म्हटले पाहिजे. सकाळी अंघोळ करून, पूजेचे ठिकाण (किंवा श्रद्धास्थळ) स्वच्छ करून म्हणायला बसावे. मग श्रद्धेच्या भावनेने हात जोडून, देवाप्रती असलेल्या आध्यात्मिक भावनेने ते म्हणावे.

हिंदू धर्म ही जगण्याची पद्धती आहे. संपूर्ण दिवस हा चेतनापूर्ण असावा अशी आम्ही कामना करतो आणि इतरांचे आपल्याशी पटत असो किंवा नसो त्यांचा आदर आणि संरक्षण करण्याचे वचन देखील देतो. त्यामुळे आपली प्रार्थना ही हनुमान चालिसा म्हणण्यावरच येऊन थांबत नाही.

त्यांची ओळख त्यांच्या हनुमान चालिसामुळे आहे. हनुमान चालिसा म्हणताना त्यांचा आवाज फ़ार सुंदर वाटतो. समजा आपल्याला त्यांनी म्हटलेल्या आवाजात हनुमान चालिसा ऐकायचे असेल, तर आपण नेहमी गुलशन कुमार यांनी गायलेले हनुमान चालिसा ऐकावे.

हनुमान चालिसा सगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि असे शक्य आहे कारण हिंदु धर्मामध्ये एकात्मता आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची भावना आहे.

हनुमानाचा उपवास मंगळवारी करावा
मंगळवार हा हनुमानाचा वार असल्याचे मानले जाते आणि आयुष्यात संकट असलेली बरीच जणं या दिवशी उपवास करून त्याच्या प्रती असलेली श्रद्धा दाखवितात आणि संकट मुक्त होण्याचा प्रयत्न देखील करतात.

सकाळ पासून संध्याकाळपर्यंत लोकं उपवास करतात. गणपती आणि हनुमानाची भक्ती करण्याकरिता सकाळी लवकर उठून अंघोळ करून भक्ती करावी. या दिवशी लाल कपडे घालावे आणि देवाला लाल फ़ूल वहावे.

हनुमान आपल्या सगळ्या भक्तांना संकट मुक्त करतो आणि चांगले आयुष्य जगण्याकरिता शक्ती देखील प्रदान करतो.

हनुमान चालिसाचे फ़ायदे
हनुमान चालिसा आपल्याला भक्तीमार्ग दर्शविते, एक चांगला भक्त कसे बनावे आणि स्वत:वर विश्वास कसा ठेवावा हे देखील सांगते. आयुष्य कठीण असेल , तर आपण भक्ती मार्गाचा अवलंब करणे फ़ार महत्वाचे असते कारण या काळातच आपली परीक्षा होत असते आणि अधिक चांगली व्यक्ती, बनून आपल्या आंतरिक ताकदी जागृत करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. हनुमान आपल्याला इतरांचा आदर करण्यास शिकवितो मग ते कोणत्याही परिस्थितीत असो, कोणत्याही प्रकारे असो, लिंग, देश आणि इतर गोष्टींचा देखील त्याला फ़रक पडत नाही त्याच्या भक्तीमुळे आपण संपूर्ण जगाकडे चांगूल पणाने बघू लागतो आणि त्याचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करतो.

हा लेख विविध भारतीय भाषांमध्ये वाचण्याकरिता येथे क्लिक करा.

Check Hanuman Chalisa in Other Languages:

Hanuman Chalisa Lyrics in Malayalam PDF Download